Ad will apear here
Next
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार
‘क्विकहील’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करताना ‘डीएससीआय’चे पदाधिकारी

मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

या सन्मानाने क्षेत्रातील आघाडीची सायबर सुरक्षा कंपनी म्हणून ‘क्विकहील’चे स्थान अधिक बळकट झाले आहे. ‘क्विकहील’ला मिळालेल्या या सन्मानाने आयटी सुरक्षा आणि डेटा प्रोटेक्शन सोल्युशन्स प्रदान करणारी आघाडीची कंपनी म्हणून त्यांची २५हून अधिक वर्षांची उत्कृष्ट कारकिर्द अधोरेखित झाली आहे.

क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलाश काटकर म्हणाले, ‘अगदी स्थापनेपासून ‘क्विकहील’ निरंतर इनोव्हेशनमार्फत डिजिटल जगाला सुरक्षित करण्याबाबत वचनबद्ध राहिली आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण उत्पादने आणली आहेत. ‘डीएससीआय’ आणि ‘नासकॉम’ यांसारख्या सर्वोच्च संस्थांकडून सायबर सुरक्षा आद्यप्रवर्तक अशी मान्यता मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.’

‘डीएससीआय’ ही नासकॉमद्वारे उभारण्यात आलेली संस्था भारतात सायबर सुरक्षा व गोपनीयता या बाबत उत्कृष्ट पद्धती, मानके व उपक्रम दाखल करून सायबर क्षेत्रास सुरक्षित आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी कार्यरत आहे. ‘डीएससीआय एक्सलन्स’ पुरस्कार डिजिटल धोक्यांवर उपाययोजना करणाऱ्या, लवचिकता निर्माण करणाऱ्या व व्यवसायासाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या सायबर सुरक्षा कंपन्या, व्यक्ती, कॉर्पोरेट संस्था यांना दिले जातात. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZQYCH
Similar Posts
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language